अशी वाढवा रोगप्रतिकार शक्ती.

Image Source रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्यासाठी तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही सोप्या पद्धतीनेही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवू शकता. तुमचा दैनंदिन जीवनक्रम बदलू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. कफ न वाढवणारा आहार घ्या. सात्विक आणि हलक्या आहारावर भर द्या. अतिमसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ खाणे टाळा. हळद ही बहुगुणी आहे. हळदीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दूध व पाण्यातून हळद घेतल्याने फायदा होतो. घशात खवखव वाटत असल्यास पाण्यात हळद घालून गुळण्या करा. च्यवनप्राश घेताना तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात घालून खाल्ल्यानेही फायदा जाणवतो. चहा वारंवार घेऊ नका. चहामुळे पित्त वाढते. दुधात साखरेसोबत हळद, मिरी आणि दालचिनी समप्रमाणात घालून काढा करावा. चहाऐवजी हा काढा गुणकारी ठरतो. मधुमेह असलेल्यांनी मात्र यात साखरेचा वापर करू नका. तयार मसाला जेवणात वापरू नका. घरात असलेल्या खडा मसाल्याचा वापर जेवणात करा. मसाल्याचे पदार्थ अग्नी वाढवतात. शरीरात अग्नी वाढल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. मानसिक स्वास्थासाठ...