इंजिनिअरिंग , एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्ट अॅंड क्राफ्टसारख्या प्रोफेशनल कोर्सचे शिक्षण घेणा-या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, जोपर्यंत लॉकडाउन संपत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. या बरोबरच शिक्षकांचे वेतन ही थांबवलं जाणार नाही. तसेच या काळात कोणाची ही नोकरी जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करत असलेली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे सदस्य आणि प्राध्यापक सचिव राजीव कुमार यांनी सर्व महाविद्यालयांना याबाबत पत्र लिहिले आहे.

