गुगल इंडियाचे कोरोनाविषयक मराठी भाषेतील विशेष संकेतस्थळ

सध्या सोशल मीडीयावर विविध मेसेज, पोस्ट सर्रास शेअर होताना दिसतात. मात्र बऱ्याचदा त्याची विश्वासार्हता पडताळली जात नाही, त्यामुळे आता गुगल इंडियाने मराठी भाषेत कोरोना विषाणूला समर्पित असणारे नवे संकेतस्थळ आणले असून या माध्यमातून जागतिक पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतची माहिती सर्वसामान्यांना मिळणे सुलभ होणार आहे.

या संकेतस्थळावर कोरोना (कोविड-१९) ची लक्षणे, हेल्पलाईन क्रमांक, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती असा सर्व तपशील असणार आहे. गुगल इंडियाचे www.google.com/covid19

हे संकेतस्थळ मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचे वर्गीकरण तीन टप्प्यांत केले असून त्यात आरोग्यविषयक माहिती, सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती व स्त्रोत यांचा समावेश आहे. आऱोग्यविषयक साक्षरता आणि सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून गुगलने हा उपक्रम हात घेतला आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)