बालभारतीची पुस्तके ऑनलाईन पीडीएफ स्वरुपात मिळणार.

e-balbharati official home page

येत्या वर्षात दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बालभारतीने बारावीची पुस्तक पीडीएफद्वारे ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 12 वीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं (Balbharti HSC 12 std Books Online) आहे. त्यामुळे बाजारात पुस्तकं कशी आणायची असा प्रश्न बालभारती प्रकाशनाला पडला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध होणे गरजेचे आहे.
बालभारतीने बारावीच्या सर्व विषयांची पुस्तक तयार केली आहेत. ही पुस्तकं छापूनही तयार आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे बालभारतीच्या अधिकृत वेबसाईटवर पीडीएफद्वारे पुस्तक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)