आरोग्यासाठी दररोज सफरचंद खाणे फायद्याचे
Image Credit - www.theverge.com
● दररोज सफरचंद खाल्ल्याने श्वसनसंस्थेचं आरोग्य उत्तम राहतं.
● अॅलर्जी आणि संसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते.
● कोरडा खोकला झाल्यास गोड सफरचंद खाल्ल्याने आराम मिळतो.
● सफरचंदामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहून त्यांची झीज होत नाही.
● संधिवात, सांधेदुखी किंवा गाऊटसारखे आजार असल्यास सफरचंद उकडून खाल्ल्याने फायदा होतो.
● सफरचंदामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेंदूच्या पेशींची झीज होत नाही आणि त्यांचं आरोग्य सुधारतं.
● ताण जास्त वाढला असल्यास सफरचंदाचा आहारत समावेश केल्याने ताण कमी होऊन उत्साह, जोम आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.
● सफरचंद दररोज खाल्ल्याने मेंदूचे आणि मानसिक अनेक विकारांपासून रक्षण होतं.
● सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास दररोज उपाशीपोटी सफरचंदाला मीठ लावून खाल्ल्याने डोकेदुखी कमी होते.