सूर्यप्रकाशात करोना विषाणू नष्ट होतात,शास्त्रज्ञांचा मोठा दावा.


करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे".

"आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे," अशी माहिती त्यांनी दिली. "तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं.

मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. "प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल," असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)