अल्लू अर्जुनचा नवा चित्रपट 'पुष्पा' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
तेलगू स्टार अल्लू अर्जुन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू आज 37 वर्षांचा झाला आहे.
त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक सोशल मीडियावर जाहीर केले आहे. यासह त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
पुष्पा : या चित्रपटाचे नाव 'पुष्पा' असेल. सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अल्लू रफ अँड टफ लूकमध्ये दिसला आहे.
पोस्टर आऊट : चित्रपटाचे पहिले पोस्टर स्टारच्या क्लोजअपवर आधारित असताना दुसर्या पोस्टरमध्ये तो जमिनीवर बसलेला दिसत आहे, तर पोलिस त्याच्या पाठीमागे उभे आहेत आणि वाहनात चंदन भरले जात आहे.
सिनेमाची कथा: हा चित्रपट चंदनच्या तस्करीवर आधारित असल्याच्या वृत्तावर या पोस्टरद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.