अशी वाढवा रोगप्रतिकार शक्ती.
रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्यासाठी तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही सोप्या पद्धतीनेही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवू शकता.
- तुमचा दैनंदिन जीवनक्रम बदलू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा.
- कफ न वाढवणारा आहार घ्या. सात्विक आणि हलक्या आहारावर भर द्या.
- अतिमसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ खाणे टाळा.
- हळद ही बहुगुणी आहे. हळदीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दूध व पाण्यातून हळद घेतल्याने फायदा होतो.
- घशात खवखव वाटत असल्यास पाण्यात हळद घालून गुळण्या करा.
- च्यवनप्राश घेताना तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
- तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात घालून खाल्ल्यानेही फायदा जाणवतो.
- चहा वारंवार घेऊ नका. चहामुळे पित्त वाढते.
- दुधात साखरेसोबत हळद, मिरी आणि दालचिनी समप्रमाणात घालून काढा करावा. चहाऐवजी हा काढा गुणकारी ठरतो. मधुमेह असलेल्यांनी मात्र यात साखरेचा वापर करू नका.
- तयार मसाला जेवणात वापरू नका. घरात असलेल्या खडा मसाल्याचा वापर जेवणात करा. मसाल्याचे पदार्थ अग्नी वाढवतात. शरीरात अग्नी वाढल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
मानसिक स्वास्थासाठी :
- टीव्ही, सोशल मिडीयावर कोरोना संदर्भातील बातम्या सतत पाहू नका. त्यामुळे नकारात्मक विचार मनात येणे सुरू होते.
- टीव्ही, मोबाईल पाहण्यापेक्षा रिकाम्या वेळात वाचन करा.
- स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. छंद जोपासा आणि वाढवा.