महाविद्यालयं कधी सुरू होणार? युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. अशात आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयं सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडेल अशी माहिती दिली आहे.२०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.

UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अपूर्ण राहिलेला पाठ्यक्रम ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निंग/ सोशल मीडिया/ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांच्या माध्यमातून ३१ मे २०२० पर्यंत शिकवण्यात येऊन पूर्ण करण्यात यावा असं विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटलं आहे. तसंच प्रोजेक्ट वर्क, इंटर्नशीप रिपोर्ट, ई लेबल्स, अभ्यासक्रम पूर्ण शिकवून होणे, अंतर्गत मूल्यमापन, असाइनमेंट हे सगळं १ जून ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावं. यानंतर होणाऱ्या परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान या दरम्यान घेतल्या जातील. तसंच या परीक्षांचे निकाल ३१ जुलै २०२० रोजी जाहीर केले जातील.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीची महाविद्यालयांसाठी नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पार पडेल. त्यांचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यापासून सुरु होईल. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२० सुरु होईल असंही युजीसीने स्पष्ट केलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)