भारत सरकारने लाँच केले 'आरोग्य सेतू' App

 भारत सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी 'आरोग्य सेतू' हे मोबाईल अ‌ॅप लाँच केले आहे. 

विशेष : सरकार या अॅपच्या माध्यमातून कोरोना बाधित रूग्णांचे लोकेशन शोधू शकणार आहे. याशिवाय युजर्स हे कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आहेत की नाही याची माहितीदेखील समजू शकणार आहे. 

 हे अॅप लाँच करण्याआधी सरकारने कोरोना कवच या नावाचे देखील अॅप लाँच केले होते.

आरोग्य सेतू असे करेल काम
हे अॅप युजर्सच्या स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करेल. सोबतच कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात युजर्स आहे की नाही हे ब्लूटूथच्या माध्यमातून शोधण्यास या अॅपची मदत होऊ शकते. 

 तसेच युजर्स आणि कोरोनाबाधित रूग्ण यांच्यात किती अंतर आहे समजण्यास मदत होणार असून कोरोनापासून कसे संरक्षण करावे याच्या टिप्स देखील यामध्ये वाचता येणार आहे