हुकूमशहा किम जोंग उन मृत्यूच्या उंबरठ्यावर? ब्रेन डेड झाल्याची चर्चा


उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याचे जोरदार चर्चा जगभर सुरू झाली आहे.
अनधिकृत वृत्तानुसार किम जोंग याचा मेंदू काम करणं बंद झाला असून त्याचा रुग्णालयात मृत्यूशी लढा सुरू आहे. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी किम जोंगची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं आहे. किम जोंग उनच्या आजोबांची म्हणजेच दुसरे किम सुंग यांची 15 एप्रिलला जयंती होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला किम उपस्थित राहू शकला नव्हता. तेव्हापासूनच किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. किमच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांबाबत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)