नोकरदार आणि करदात्यांनो नक्की वाचा; मोदी सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय
1) ईपीएफ काढणे :-
सरकारने कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरदारांसमोर आलेल्या अडचणी पाहता एक विशेष तरतूद केली आहे. त्या अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खात्यातून तीन महिन्यांइतके वेतन काढण्याची सूट दिली आहे. या रकमेवर सेवा शूल्काचीही सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
2) जीएसटी विवरणपत्र :-
मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
3) कर परतावा :-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रुपयांचा कर परतावा त्वरीत जारी करण्याची घोषणा केली. तसेच ५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसटी/कस्टम परतावा त्वरीत जारी केले जातील अशी सूचना कर विभागाने दिली.
4) आधार-पॅन लिंकिंग :-
आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची कालमर्यादाही ३१ मार्चवरुन ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताला.
5) प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ :-
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. उशिराने प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.