Google Pay द्वारे करा या सेवांचे ऑनलाईन पेमेंट


Google Pay द्वारे करा या सेवांचे ऑनलाईन पेमेंट

लॉकडाऊनच्या काळात डिजिटल वॉलेट गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

तुम्ही घरी बसल्या बसल्या गुगल पे द्वारे अनेक सेवांचे पेमेंट्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

मोबाईल रिचार्ज 
तुम्ही गुगल पे द्वारे कुटुंबातील सदस्य, मित्रांच्या मोबाईलवर रिचार्ज करू शकता. यासाठी तुम्ही अ‍ॅपमध्ये गेल्यावर न्यू पेमेंट पर्याय निवडून सहज मोबाईल रिचार्ज करू शकता.

DTH आणि वीजेचे बिल 
गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही सहज डीटीएच, इंटरनेट आणि वीजेचे बिल भरू शकता. तुम्हाला ज्या कंपनीचे बिल भरायचे आहे, ती कंपनी निवडून सहज बिल भरता येईल.

मेडिकल शॉप आणि किराणा सामानाचे पेमेंट 
तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून जवळील स्टोरमधून औषधे अथवा घरातील सामान मागू शकता. याचे पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे दुकानदाराचा गुगल पे ला लिंक असलेले मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

अ‍ॅमेझॉन आणि बिग बास्केटवरून मागवलेल्या सामानाचे पेमेंट 
गुगल पे वरून तुम्ही अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट आणि ग्रोफर्सवरून मागवलेल्या सामानाचे पेमेंट करू शकता. यासाठी तुम्ही यूपीआय आयडीचा उपयोग करू शकता. ही आयडी तुम्हाला अ‍ॅपच्या प्रोफाईलमध्ये मिळेल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)