PM किसान चे २००० रुपये जमा होत नसतील तर हे करा ...!

Image Credit तुम्ही थेट कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर - १५५२६१, पीएम किसान टोल फ्री - १८००११५५२६, पीएम किसान लँडलाइन नंबर ०११-२३३८१०९२, २३३८२४०१ त्यासोबत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता. जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहायचं असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ही सुविधा ऑनलाइन देखील प्रदान केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते. शेतकऱ्यांना त्यासाठी pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल. या टॅबमध्ये शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा...