हे लोणचे अगदी कमी साहित्यात आपण करणार आहोत.
1) १ किलो गावठी टोमॅटो
2) १ अख्खा लसुण
3) थोडेसे आलं
4) शेंगदाणा तेल - १ पाव
5) ४ चमचे तिखट
आणि महत्वाचे मीठ जे की चवीनुसार घालायचे आहे.

आता हे साहित्य तयार असेल तर करायला घेऊयात
1) टोमॅटो धुतले असतीलच असे समजून आता ते कापावे.
2) नंतर आले व लसणाची पेस्ट करावी.
3) कढईत तेल टाकावे.

त्यानंतर जास्त गॅस न वापरता अगदी कमी गॅसवर आले व लसणाची पेस्ट घाला. आणि ही पेस्ट परतवून घ्या.
4) आता त्यात कापलेले टोमॅटो टाका.
5) चवीनुसार मीठ टाका.
6) आता जवळपास 10 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवावे. (अधून मधून परतून घ्या)
7) 10 मिनिटे झाले असतीलच. आता त्यात 4 चमचे तिखट घाला. परत परतवून घ्या.
8) आता 10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे.
आता उघडून बघा. लोणच्याला तेल सुटले असेल. म्हणजे आता तुमचे लोणचे तयार आहे.

टीप - हे लोणचे फक्त 10 ते 12 दिवस टिकते.