ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली, संपणार आहे; तर ही बातमी तुमच्यासाठी..
देशातील ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचे दस्तावेज, पीयुसी सारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जून च्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे.
कोणतेही वाहन चालविताना चार कागदपत्रे महत्वाची असतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स आणि पीयूसी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही हार्ड कॉपी ठेवू शकत नसाल तर मोबाईल अॅपवर डिजिटल कॉपी ठेवली तरी चालणार आहे. यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवाहन हे अॅप वापरावे लागणार आहे.