Whatsapp चे सर्वात मोठे फिचर येत आहे...


येत्या काळात व्हॉटसअॅप वेबवर मेसेंजर रूम्सचं फीचर दिलं जाईल. ज्यामधून 50 लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येईल.


मेसेंजर रूम्स एक असं फीचर आहे ज्यामध्ये प्रायव्हेट लिंक शेअर करून व्हिडिओ कॉलिंग करता येईल. एवढंच नाही तर जे लोक फेसबुक वापरत नाहीत त्यांनाही व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होता येईल. फेसबुकने जाहीर केलं आहे की, व्हॉटसअॅपमध्ये एक शॉर्टकट दिला जाईल ज्याचं अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.20.139 वर टेस्टिंग सुरू केलं आहे. लवकरच हे फीचर iOS अॅपसाठी दिलं जाईल.मात्र याचा शॉर्टकट सध्या व्हॉटसअॅप वेबसाठी देण्यात आला आहे.


व्हॉटसअॅप वेबवर मेसेंजर रूमचा शॉर्टकट Attach च्या ऑप्शनमध्ये मिळेल. तो सिलेक्ट केल्यानंतर युजरला इंट्रोडक्शन पर्याय दिसेल. याशिवाय मेसेंजर रूमचा दुसरा पर्याय मेन मेन्यूमध्ये दिला जाईल. युजर्सना 'new group', 'Archeived' 'Starred' पर्याय जिथं दिले जातात त्याच ठिकाणी हा ऑप्शन मिळेल. मेसेंजर रूम क्रिएट करताना व्हॉटसअॅप तुम्हाला मेसेंजर ओपन करण्यासाठी विचारते. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. अद्याप हे कधी लाँच करण्यात येईल हे सांगण्यात आलेलं नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)