पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MPSC उमेदवारांना प्रोफाइल अपडेट करावं लागणार.

इमेज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन प्रणालीची देखभाल करण्यासाठी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवी प्रणाली कार्यन्वित करताना उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि  खात्याचे पासवर्ड बदल करणे आवश्यक आहे.अन्यथा सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रोफाईल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड बदल करणे आवश्यक आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. MPSC संकेतस्थळावर असे करा प्रोफाइल अद्यायावत  ● आयोगाच्या https://mpsconline.gov.in  या संकेतस्थळावर ‘नोंदणी’ वर जाऊन ‘फरगॉट/रिसेट पासवर्ड’ बटणवर क्लिक करा. ● यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा. ● तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.- मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.   ...

घरबसल्या जाणून घ्या PF खात्यावरील बॅलन्स.

इमेज
★ मिस्ड कॉल तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल. ★ एसएमएस तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. ★ उमंग अ‍ॅप प्ले स्टोर वरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हिस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. ★ वेबसाइट तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता. यासाठी ईपीएफओ पासबुक पोर...

शेतकऱ्यांना जुन्याच दराने खते.

इमेज
  गेल्या काही दिवसात रासायनिक खतांच्या किमती वाढल्या होत्या. यावरून मोठा विरोध पाहायला मिळत होता. आता विरोधानंतर केंद्र सरकारने जुन्याच दरात खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने खतांवरील अनुदानात वाढ केल्याने आता खत जुन्याच किंमतीत मिळतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताचे एक पोते 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे. डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट खतांवरील अनुदानात 140% वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार आहे.  शेतकऱ्यांना डीएपीची पिशवी 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. या अनुदानापोटी सरकार 14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

म्युकरमायकोसीस : वाचा सविस्तर

इमेज
म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार असून, म्युकरमायसिट्स विषाणूंच्या गटामुळे होतो. संपूर्ण वातावरणात, माती तसेच सडणारे सेंद्रिय पदार्थ(पाने, कंपोस्ट) आणि सडणारे लाकूड यामध्ये हा विषाणू आढळतो. वातावरणातील अशा बुरशीजन्य बीजाणूंच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. ज्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या आहेत, तसेच इतर आजारांशी लढण्यासाठी जे लोक औषधे घेत आहेत त्यांना हा आजार होऊ शकतो. त्वचेवर कापलेले किंवा भाजलेले असल्यास, त्याद्वारे या विषाणूच्या बुरशीने प्रवेश केल्यानंतर त्वचेवर म्युकरमायकोसीस विकसित होऊ शकतो. अशी आहेत लक्षणे :   डोळे किंवा नाक दुखणे, तसेच नाक किंवा डोळ्यांच्या भोवती लालसरपणा येणे. ताप येणे. तीव्र डोकेदुखी. कफ होणे. श्वास घ्यायला त्रास होणे. रक्ताच्या उलट्या होणे. मानसिक स्वास्थ्य बिघडणे. कोणाला होऊ शकतो? ज्यांचा डायबेटिस हा प्रमाणाच्या बाहेर आहे. सतत औषधांच्या सेवनामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. दीर्घकाळ आयसीयू वर उपचार घेत असणारे रुग्ण. कॅन्सरसारख्या सहव्याधी असणारे रुग्ण. कशी घ्याल काळजी? धुळीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावा. बागकाम करताना प...