MPSC उमेदवारांना प्रोफाइल अपडेट करावं लागणार.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन प्रणालीची देखभाल करण्यासाठी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवी प्रणाली कार्यन्वित करताना उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि खात्याचे पासवर्ड बदल करणे आवश्यक आहे.अन्यथा सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रोफाईल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड बदल करणे आवश्यक आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
MPSC संकेतस्थळावर असे करा प्रोफाइल अद्यायावत
● आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर ‘नोंदणी’ वर जाऊन ‘फरगॉट/रिसेट पासवर्ड’ बटणवर क्लिक करा.
● यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा.
● तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.- मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
● त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी आयोगाकडे नोंदणीकृत असलेली जन्मदिनांक टाका आणि सबमिट करा.
● सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड रिसेट करा अशी स्क्रिन दिसेल. याद्वारे आपल्या पसंतीचा नवीन पासवर्ड तयार करावा.
● पासवर्ड रिसेट झाल्यावर नवीन ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृती ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच नवीन पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल.
● तांत्रिक अडचण आल्यास येथे करा संपर्कआयोगाच्या नव्या प्रणालीवर प्रोफाईल अद्यायावत करताना तांत्रिक अडचण आल्यास १८००२६७३८८९ / १८००१२३४२७५ टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा. तसेच support-online@mpsc.gov.in ई-मेलवर संपर्क करावा.