म्युकरमायकोसीस : वाचा सविस्तर


म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार असून, म्युकरमायसिट्स विषाणूंच्या गटामुळे होतो. संपूर्ण वातावरणात, माती तसेच सडणारे सेंद्रिय पदार्थ(पाने, कंपोस्ट) आणि सडणारे लाकूड यामध्ये हा विषाणू आढळतो. वातावरणातील अशा बुरशीजन्य बीजाणूंच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. ज्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या आहेत, तसेच इतर आजारांशी लढण्यासाठी जे लोक औषधे घेत आहेत त्यांना हा आजार होऊ शकतो. त्वचेवर कापलेले किंवा भाजलेले असल्यास, त्याद्वारे या विषाणूच्या बुरशीने प्रवेश केल्यानंतर त्वचेवर म्युकरमायकोसीस विकसित होऊ शकतो.

अशी आहेत लक्षणे : 
डोळे किंवा नाक दुखणे, तसेच नाक किंवा डोळ्यांच्या भोवती लालसरपणा येणे.
ताप येणे.
तीव्र डोकेदुखी.
कफ होणे.
श्वास घ्यायला त्रास होणे.
रक्ताच्या उलट्या होणे.
मानसिक स्वास्थ्य बिघडणे.

कोणाला होऊ शकतो?
ज्यांचा डायबेटिस हा प्रमाणाच्या बाहेर आहे.
सतत औषधांच्या सेवनामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे.
दीर्घकाळ आयसीयू वर उपचार घेत असणारे रुग्ण.
कॅन्सरसारख्या सहव्याधी असणारे रुग्ण.

कशी घ्याल काळजी?
धुळीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावा.
बागकाम करताना पायात बूट, लाँग पँट, हातात ग्वोव्हज् घाला.
त्वचेची अॅलर्जी होऊ नये म्हणून साबण लावून स्वच्छ हात-पाय धूत रहा.

कसा ओळखाल आजार?
नाक चोंदणे, सतत नाक गळणे, गालाचे हाड दुखणे.
चेह-याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे किंवा सूज येणे.
नाकाजवळील भाग किंवा टाळूवर काळसर डाग पडणे.
दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे.
अंधुक दिसणे, डोळे दुखणे, ताप येणे त्वचेच्या विकृती होणे.
छातीत दुखणे, त्वचेतून रक्तस्त्राव होणे, श्वसन क्रिया बिघडणे.

काय करावे?
हायपरग्लायसेमिया नियंत्रित ठेवणे.
कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे.
डायबेटिस असणा-या व्यक्तींनी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे योग्य डोस योग्य वेळी घेणे.


 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)