केंद्र व राज्य लाभार्थी निधी वितरण


 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत.

डिसेंबर, २०२४ पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च, २०२५ चे अर्थसहाय्य DBT द्वारे वितरीत करावयाचे आहे. तसेच, केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर २०२४, जानेवारी ते मार्च, २०२५ या महिन्यांचे दरमहा अर्थसहाय्य वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात जमा करावयाचे आहे. त्यासाठी सदरहू योजनांकरीता स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)