पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुलाब शेतीतून लाखो कमावणारी पुण्यातील महिला

इमेज
मुंबई : भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशात पुरूषप्रधान संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी म्हटलं की शेतात काम करणारा किंवा आभाळाकडे बघणारा शेतकरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पुढाकाराने शेती करणाऱ्या महिला आपल्याला क्वचितच दिसतात. पण मुंबईसारख्या शहरात लहानाच्या मोठ्या झालेल्या, लग्न होऊन पुण्यात आलेल्या, शेतीची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना शेती करण्याचं धाडस करत त्यातून चांगलं अर्थार्जन करण्याचा पराक्रम एका महिलेने केला आहे.   साधारण आठ वर्षापूर्वी हर्षदा या पुण्यातील नामांकित कंपनीत एचआर अॅडमिन पदावर काम करायच्या. नोकरी करत असताना विक्रेत्यांकडील गुलाबाचे फुलं पाहून त्यांना आकर्षण वाटायचं. त्यानंतर हे फुल कसं तयार होत असेल? याची शेती कशी केली जात असेल? असे प्रश्न मनात येऊ लागले. गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं.  गुलाब शेतीतील छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी शिक्रापूर, तळेगाव येथील ओळखीच्या गुलाब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली. नंतर शिक्रापूर ये...