कापसाचे दर वाढतीलच याची शाश्वती नाही


 भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


खुल्या बाजारातील सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला ७ हजार ८०० रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येणार नाही.


सरकीचे दर उत्पादनही घटले


👉खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत.


👉गेल्या वर्षी ४ हजार २०० रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी ३ हजार ३०० ते ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)