दुधाळ जनावरांसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान
मुंबई : पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप केली जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे
दुधाळ जनावरे वाटप योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाबीएमएस वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास ९ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत एक महिना असणार आहे, या वैयक्तिक लाभाच्या योजनेचे १ हजार १३४ लाभार्थी उद्दिष्ट असणार आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी जास्त अर्ज दाखल झाले होते, दरम्यान पात्र अर्जदारांना अगोदर संधी दिली जाणार आहे.
★ पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानापर्यंत दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते.
★ गेल्यावर्षी दीड हजार नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. या लाभाथ्र्यांना दहा शेळ्या, मेंढ्या किंवा गाय गटामध्ये दोन गायी वितरित करण्यात आल्या आहेत.
वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज केल्यानंतर पात्र अर्जदाराला पशुसंवर्धन विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा, राज्याबाहेरील बाजारातून जनावरांची विक्री करून दिली जाते.
ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणारे अर्ज महाबीएमएस या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, तेथे जाऊन अर्ज करायचा आहे. निवड झाल्यानंतर पात्र अर्जदारांना एक महिन्यात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे वाटप केले जाते.
पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे, अर्ज करण्यासाठी एक महिना मुदत असणार आहे.
गतवर्षी या योजनसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते , प्रथम त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
◆ अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक - येथे क्लिक करा
◆ अर्ज करण्यासाठी अँप लिंक - येथे क्लिक करा