मुंबई : बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने देशातील काही राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट आले आहे.तसेच ओडिसा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यातील एक चक्रीवादळ 'बिपरजॉय'पेक्षाही जास्त धोकादायक असू शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला असल्याचे वृत्त ए एन आय ने दिले आहे. 

वृत्तानुसार, ओडिसा किनारी भागात १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा ताशी वेग ४५ ते ६५ किमी इतका असू शकतो. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


ओडिशा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या या वाऱ्याचं रुपांतर पुढे चक्रीवादळात होऊ शकतं. यातील एक चक्रीवादळ 'बिपरजॉय'पेक्षा धोकादायक असू शकते, त्यामुळे मच्छिमारांनी १५ , १६ व  १७ नोव्हेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

या चक्रीवादळामुळे येणाऱ्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.