Image Credit - Harvard Health

सर्वच व्यायामप्रकार सर्वच व्यक्तींना आवडतील किंवा करायला जमतील असे नाही. आपल्या मित्र – मैत्रिणी कुठला तरी ठराविक व्यायाम करतात म्हणून आपणही तेच करायला हवे असे नाही. काहींना चालणे आवडते, काहींना पळणे, काहींना सायकलिंग तर काहींना पोहोणे आवडते. आपल्याला जो व्यायामप्रकार आवडत असेल, ज्या मुळे आपल्याला शारीरिक स्वास्थ्याबरोबरच आनंदही मिळत असेल असा व्यायामप्रकार निवडावा. अश्या प्रकारे हा व्यायाम आपोआपच नियमित केला जाईल, आणि त्या मुळे आरोग्यही चांगले राहील. त्याचबरोबर आपल्या शरीराची ठेवण आपल्याला आवडत नाही म्हणून व्यायाम करायचा ही भावना मनात असू नये. व्यायामामुळे शरीर सुडौल होण्यास मदत मिळेलच, शिवाय, व्यायामामुळे आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, त्यामुळे आपल्या एनर्जी लेव्हल्स चांगल्या राहिल्या पाहिजेत हे ओळखून व्यायाम करायला हवा.