जगाची ही माहिती तुम्हाला आहे का?


◆ किनारा नसलेला समुद्र : 
काही समुद्र चारीही बाजूंनी जमिनीने वेढलेले असतात. भूमध्य सागर आणि काळा समुद्र ही त्याची उदाहरणे. मात्र, एक समुद्र असा आहे ज्याला कोणताही किनारा किंवा जमीन नाही. त्याचे नाव आहे सारगास्सो समुद्र. हा अटलांटिक महासागराच्या पश्‍चिमेला आहे आणि उत्तर अटलांटिकमध्ये एका बाजूला वळलेला प्रवाहच त्याची सीमा बनते. अटलांटिकच्या वळलेल्या लाटांमुळे सारगास्सो समुद्राचे पाणी नेहमी शांत असते. 

◆ पृथ्वी प्रदक्षिणा : 
पोर्तुगिज साहसवीर फर्डिनांड मॅग्लन हा जग फिरणार्‍या सुरुवातीच्या काळातील पहिल्या-वहिल्या व्यक्‍तींपैकी एक होता. सन 1480 मध्ये जन्मलेला फर्डिनांड पहिला युरोपियन होता ज्याने प्रशांत महासागर ओलांडला. सन 1519 मध्ये तो आपल्या सहकार्‍यांसह सागरी मोहिमेसाठी बाहेर पडला. अनेक देशांचा प्रवास करून ही मोहीम स्पेनमध्ये जिथे सुरुवात झाली तिथे संपली. 270 जणांसह सुरू झालेली ही मोहीम संपली त्यावेळी केवळ 18 जण वाचले होते. या प्रवासातच खुद्द फर्डिनांडचाही मृत्यू झाला. 

◆ नो मॅन्स लँड : 
जमीन, समुद्रकिनारा आदींसाठी एकमेकांबरोबर झगडणारे अनेक देश असलेल्या या पृथ्वीतलावरच काही जागा अशा आहेत ज्यावर कुणाचीच सत्ता नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दोन देशांच्या सीमेदरम्यान ‘नो मॅन्स लँड’ हा एक असा परिसर असतो. ज्यावर कोणत्याही देशाची कायदेशीर सत्ता नसते. अर्थात ही जागा मिळावी म्हणून एखादा देश दावा करू शकतो. मात्र, आफ्रिकेत एक ठिकाण असे आहे जे कुणालाही हवेसे वाटत नाही. इजिप्त आणि सुदानच्या दरम्यान ‘बीर ताविल’ नावाचा हा 2060 वर्ग किलोमीटरचा परिसर आहे. हा परिसर ओसाड, नापीक आणि दुष्काळग्रस्त आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)